Pages

RSS

Welcome to my Blog
Hope you enjoy reading.

Saturday, 21 May 2011

कशी पुर्ण करू मी कविता


अशीच एकदा बसले होते
विचार मनी आला असा
काय करू मी नुसते बसून
लेखन करू की लिहू कविता ?

ईंग्रजी कविता घासून-पुसून
बनवली आयुष्यावर एक कथा
पुढचे काही सुचलेच नाही
काय उपयोगाच्या त्या केलेल्या प्रथा

बाबा म्हणतात मोठी कवयित्री
बनायचे तुला असेल जर
दिलेल्या वेळात कविता तुझी
जिद्दीने तु पुर्ण कर

आई म्हणते नुसते आता
यमक जुळवायचा प्रयत्न कर
बाबा म्हणतात - करे पर्यंत
कविता पुर्ण झाली नाही तर ?

आई-बाबा दोघे आता
कवितेचाच विचार करतात
शब्द कुणाला कळले नाही
तर उलटून नेहमी माझ्यावर हसतात

- मॄण्मयी शैलेंद्र साठे

आई ! (जागतिक मातृ-दिना निमित्त)

 आई ! का गं तु दिवसभर राबतेस ?
मी वाईट वागले तरीही
जवळ मला घेतेस !

प्रेमाने हात डोक्यावर फिरवून
पापे माझे घेतेस
दिवसभराची भांडणं
आपल्या डोळ्यात भरुन घेतेस !

स्वयंपाक करताना डोळ्यातलं पाणी
गालावरून जेव्हा ओघळतं
हळूच पदराने पुसून सांगतेस मला
कांद्यामुळे नेहेमीच असं होतं ! 

 रात्री झोपतांना मला
गोष्ट तु सांगतेस
हसत खेळत माझ्याशी
मैत्रीणीसारखी वागतेस

मी चिडल्यावर कधी
मस्करी माझी करतेस
रडायला जर लागले
तर समजूत माझी काढतेस
बाबा मला ओरडले
तर पटकन त्यांना सांभाळतेस
अंगणाभोवती छान अशी
रांगोळीसुद्धा काढतेस !

शब्द् पुरत नाहीत एवढी
आहेत तुझी कौतुके
मिठी मारु तुला की
घेऊ तुझे मुके ?

- मृण्मयी (शैलेंद्र - मानसी) साठे

(गेल्या वर्षीच्या "मदर्स डे" ला माझी आई खुप आजारी (हॉस्पीटल मधे) होती. त्यावेळी मला पहिल्यांदाच आई विषयी काही लिहावं असं वाटलं. त्या वेळी मी लिहीलेली कविता आपण खालील लिंक वर पाहू शकता)

http://mrunmayee-mydreamworld.blogspot.com/2011/03/my-mummy.html



पर्‍या खरोखर असतात का ?

पर्‍या खरोखर असतात का ?
विचार करते रोज असा मी
पर्‍या खरोखर असतात का ?
चांगल्या, वाईट, काळ्या, गोर्‍या
रडतात किंवा हसतात का ?

सुंदर निर्मळ मन त्यांचे
दृढ कधी होते का ?
चांगली कामे करतात पण
कधी वाईट मनात येते का ?

आई आई सांग ना मला
पाहीली आहेस का गं परी ?
दिसते कशी ? बोलते कशी ?
सांग जरा तु मला तरी

चमचमणारा मुकुट तिच्या
डोक्यावरती असतो का ?
केसांवरचा रातकिडा
शांत कधी बसतो का ?

- मृण्मयी शैलेंद्र साठे

तुमची ईच्छा - तुमची मुलगी

(आई-बाबा यांपैकी बाबांना आपण खुप घाबरतो. हो ना ? मला माहितीये. तुमचं उत्तर नक्की "हो" च असेल ! कारण बाबा खुप स्ट्रिक्ट असतात. तर या ठिकाणी मी बाबा आणि मुलगी यांच्यातले संभाषण दाखवले आहे !)

काय हो बाबा ?
सारखे अभ्यास करायला लावता
कंटाळून जाते मी
तरीही रागावता

सकाळी सकाळी रोज
ऑफीसला का जाता ?
घरी आल्यावर नुसते
टि.व्ही. च का पहाता ?

प्रगती-पुस्तक मिळाले
की कधी पापे घेत नाही
पापे राहीले लांबचे
साधी मिठीही मारत नाही

रोज रात्री झोपताना
गमती-जमती सांगत नाही
मी सांगते तर
मला सांगु ही देत नाही

का हो बाबा आता
नावडती झाले का मी ?
पहीले होते लहान
आता मोठी झाले का मी ?

सतत एक काळजी
मनात माझ्या आढळते
विसरून जाल का मला ?
भीती अशी वाटते

मोठी होतेय मी
असे रोजच मला जाणवते
स्वप्न आहे हे अशी
मनाची समजूत मी घालते

- मृण्मयी शैलेंद्र साठे

Friday, 20 May 2011

Mistake...

Mistakes are the god’s only gift
We carry through out the life…
The perfect key which brings..,
Perception & Perfection to the life!


We can not tell where
a Mistake is actually done
we do hundreds of mistakes
and not just a single one

It makes us to be true
or make believe in ourselves
it's not made by GOD,
Princess, Fairies or elves

We can not write a Mistake
to be pass or fail
we can not send a Mistake
through our daily Email

- Mrunmayee Sathe