Pages

RSS

Welcome to my Blog
Hope you enjoy reading.

Saturday, 21 May 2011

आई ! (जागतिक मातृ-दिना निमित्त)

 आई ! का गं तु दिवसभर राबतेस ?
मी वाईट वागले तरीही
जवळ मला घेतेस !

प्रेमाने हात डोक्यावर फिरवून
पापे माझे घेतेस
दिवसभराची भांडणं
आपल्या डोळ्यात भरुन घेतेस !

स्वयंपाक करताना डोळ्यातलं पाणी
गालावरून जेव्हा ओघळतं
हळूच पदराने पुसून सांगतेस मला
कांद्यामुळे नेहेमीच असं होतं ! 

 रात्री झोपतांना मला
गोष्ट तु सांगतेस
हसत खेळत माझ्याशी
मैत्रीणीसारखी वागतेस

मी चिडल्यावर कधी
मस्करी माझी करतेस
रडायला जर लागले
तर समजूत माझी काढतेस
बाबा मला ओरडले
तर पटकन त्यांना सांभाळतेस
अंगणाभोवती छान अशी
रांगोळीसुद्धा काढतेस !

शब्द् पुरत नाहीत एवढी
आहेत तुझी कौतुके
मिठी मारु तुला की
घेऊ तुझे मुके ?

- मृण्मयी (शैलेंद्र - मानसी) साठे

(गेल्या वर्षीच्या "मदर्स डे" ला माझी आई खुप आजारी (हॉस्पीटल मधे) होती. त्यावेळी मला पहिल्यांदाच आई विषयी काही लिहावं असं वाटलं. त्या वेळी मी लिहीलेली कविता आपण खालील लिंक वर पाहू शकता)

http://mrunmayee-mydreamworld.blogspot.com/2011/03/my-mummy.html



0 comments:

Post a Comment